मदत फेरीला वैजापूरकरांचा भरभरून प्रतिसाद
वैजापूर ता.09 -"मदत करा रे -मदत करा" आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा" मदतीचा हाथ--शेतकऱ्यांना साथ" अशा घोषणा देत "शिव-फुले-शाहू-आंबेडकर" समितीच्यावतीने गुरुवारी (ता.09) शहरातून "पूरग्रस्त मदत फेरी काढण्यात आली .
या मदतफेरीला शहरातील नागरिक, व्यापारी, हातगाडीवाले, फळ विक्रेते, वाटसरूयांच्यासह अगदी भीक मागून जगणाऱ्या महिला व पुरुषांनी सुद्धा सहाय्य केले. या मदतफेरीत 33 हजार रुपयांची मदत जमा झाली. जमा झालेल्या रकमेचा बँकेतून डी.डी.काढून मुख्यमंत्री सहाय्य निधीला पाठवण्यात आला .
"शिव-फुले-शाहू-आंबेडकर" या समितीचे जगन गायकवाड, दिलीप अनर्थे, सुधाकर आहेर, रणजित मथुरिया, आबासाहेब जेजुरकर, बाबासाहेब गायकवाड, रमेश तोडकर, देविदास अनर्थे, दिलीप विश्वासू, अण्णासाहेब ठेंगडे, धोंडीरामसिंह राजपूत यांनी यात पुढाकार घेतला.
0 Comments