news today, महाबोधी बुध्दविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी वैजापुरात आज भव्य मोर्चा

वैजापूर, ता.06 - तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं ते स्थळ, जे सर्व बौद्ध बांधवांच्या आस्थेचं केंद्र आहे आणि ज्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरव प्राप्त आहे ते बिहार राज्यातील महाबोधी बुध्द विहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे तसेच बिहार टेंपल ॲक्ट कायदा 1949  (BTA) रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी वैजापूर शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे..

हा मोर्चा आज (ता.06) सकाळी अकरा वाजता शहरातील मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे या मोर्चाचा समारोप होईल. या मोर्च्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य भन्ते विनाचार्य, पूज्य भिक्खू संघरत्न आणि पूज्य भिक्खू आनंद सुमनसिरी थेरो उपस्थित राहणार आहेत..या प्रसंगी वैजापूर तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक-उपासिका यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाबोधी बुद्ध विहार बचाव समिती, वैजापूर तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments