news today, अतिवृष्टीने शेतातील पीक गेल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याची शेतातच आत्महत्त्या

 वैजापूर तालुक्यात हिंगणे कन्नड येथील घटना...                          

प्रभाकर जाधव 
---------------------------
गारज, ता. 5 - मागील आठवड्यात वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतातील संपूर्ण पिक वाया गेल्याचे पाहून निराश झालेल्या शेतकऱ्याची शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.5) वैजापूर तालुक्यातील हिगंणे कन्नड येथे घडली. सतीश कारभारी निकम (वय 44 वर्ष)
असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  

.                   मयत सतीश कारभारी निकम 

सतीश हा संभाजीनगर येथील खाजगी कंपनीत काम करत होता. परंतु रविवारची सुट्टी असल्याने 5 ऑक्टोबर रोजी सकाळी सतीश हिंगणे गावात आला. अकरा वाजता तो आपल्या शेतात चक्कर मारायला गेला. शेतामध्ये मात्र पिकाची परिस्थिती खूपच गंभीर झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर निराश होऊन त्याने तेथेच विषारी औषध घेतले व त्यानंतर आपल्या नातेवाईकाला छत्रपती संभाजीनगर येथे फोन करून सांगितले. आपल्याला बँकेकडून कर्ज काढावे लागते परंतु तत्पूर्वी त्याने विषारी औषध घेतले होते. त्यामुळे तो जागेवरच बेशुद्ध झाला. संभाजीनगरहून नातेवाईक आल्यानंतर त्याला पाहिले असता तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला उपचारसाठी औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथून त्यांना कन्नड येथे हलविण्यात आले. कन्नड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी मनीषा मोतीगे यांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर सायंकाळी  त्यांचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

सायंकाळी हिंगणे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments