news today, बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या - आ.रोहित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

     प्रसिध्दी माध्यमांशी सवांद साधतांना आ.रोहित पवार 

छत्रपती संभाजीनगर, ता.02 - अतिवृष्टीमुळं राज्यात इतरत्र झालं त्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही शेतीचं अतोनात नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने नुकसानभरपाई द्यावी, बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आ.रोहित पवार यांनी बुधवारी (ता.01) जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे केली. आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि मागण्याचे निवेदन दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करताना आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी...

अतिवृष्टीमुळे राज्यासह जिल्हयात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विहिरींची पडझड झाली असून विद्युत पंप,शेती अवजारे तसेच जनावरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी.राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, बाधित शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी.आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.


आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तायडे पाटील, ख्वाजा शरफोद्दीन, विश्वजीत चव्हाण, आशिष पवार,सुशील बोर्डे, राजेश मोरे, संजय वाघचौरे, अशोक खोसरे आदींचा समावेश होता. आतापर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही असे मुख्यमंत्री सांगत आहेत परंतु आतापर्यंत कधी एवढा पाऊसही झालेला नव्हता.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा जेणेकरून विद्यार्थ्यांची शुल्कमाफी होईल. असे आ.रोहित पवार यावेळी म्हणाले.
 

Post a Comment

0 Comments