वैजापूर, ता.02 -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष (1925 -2025) निमित्त विजयादशमी दिवशी गुरुवारी (ता.02) शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने पथसंचलन करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शहरात पथसंचलन करण्यात आले.
शहरातील जि.प.प्रशाला (मुलांची) या शाळेच्या मैदानावर सकाळी नऊला स्वयंसेवक एकत्र आले. तेथून नगर संघचालक अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनखाली संघाच्यावतीने अत्यंत शिस्तबद्ध व संघटन कौशल्यात्मक पथसंचलन काढण्यात आले. 
पथसंचलनातील शिस्तबद्धता ठळक दिसतांना तसेच मैदानावर पथ संचलनप्रसंगी आ.रमेश बोरनारे, डॉ. दिनेश परदेशी ..
मैदानावर सर्व सेवक एकत्र जमल्यानंतर त्यांचे पांच गट( वाहिनी) करण्यात आले. प्रत्येक गटात जवळपास पन्नासच्यापुढे स्वयंसेवक होते.अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने पथसंचलननाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी ध्वज फडकविण्यात येऊन संघ प्रार्थना झाली..तालबद्ध वाद्य वाजवत स्वयंसेवक शिस्त, एकता, बंधुता व एक वाक्यातेचे दर्शन घडवीत हे पथसंचलन शहराच्या विविध भागातून तब्बल दीड ते दोन तासानंतर पुन्हा संपतस्थळी पोहचले..
पथसंचलन प्रसंगी आ.रमेश पाटील बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, रणजित चव्हाण, हेमंत दाभाडे, तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.. त्यांनीही पाचव्या व शेवटच्या वाहिनीत संचलन केले .या समयी वैजापूर पोलीस स्टेशनच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments