news today, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयात लावणीचा बार

राष्ट्रवादीची एक महिला कार्यकर्ती 'मला जाऊ द्या न घरी वाजले की बरा'... या लावणीवर नृत्य सादर करतांना व्हिडिओ व्हायरल ...

नागपूर, ता. 28 - नागपूरच्या गणेशपेठ भागात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांसमोर लावणीच्या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रविवारी झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. काही वेळातच कार्यक्रमातच लावणीचे दृश्य मोबाईलवर रेकॉर्ड होऊन सोशल मीडियावर पसरले, आणि त्यानंतर या कार्यक्रमावर राजकीय चर्चांना उधाण आले. 
दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांना करणे दाखवा नोटीस बजावली.

------------------------------------------------------------

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात कला सादर करण्यासाठी मला बोलावले होते. मी पक्षासाठी काम करते. माझ्यासह काहींचा कार्यक्रमात सत्कारही झाला. मी लावणी कलावंत असल्याने लावणी सादर केली. तिथे बऱ्याच महिलाही होत्या.
-- शिल्पा शाही नागपूर
-------------------------------------------------------------

लोप पावत चालेली महाराष्ट्राची लावणी कला जर कोणी जोपासत असेल तर त्यात वाईट काय ?

लावणी नृत्य हे महाराष्ट्राची एक प्रमुख आणि लोकप्रिय लोककला व संस्कृती आहे. हे पारंपरिक गाणे आणि नृत्याचे संयोजन आहे, जे ढोलकीच्या शक्तिशाली तालावर सादर केले जाते आणि मराठी लोकनाट्याच्या विकासात त्याचे मोठे योगदान आहे, 
तसेच लावणी ही मराठी माणसाची अस्सल कला संस्कृती आहे, ती इतर राज्यातील किंवा देशातील लोक नाही जोपसणार ती आपल्यालाच जोपासावी लागेल.
लावणीमध्ये वाईट काय आहे ? ती एक कला आहे, अंगभर कपडे घालून नृत्य करणाऱ्या लावणी कलाकार आजच्या काळातील तोकड्या कपड्यापेक्षा आकर्षक नृत्य सादर करतात, त्या अस्सल नृत्य कलेवरच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात, त्यासाठी त्यांना तोकड्या कपण्याची गरज नाही पडत, इतर नृत्य प्रकारा सारखी !
ही काला गुणसंपन्न लावणी बहुजनाची कलाकृती आणि संस्कृती आहे, म्हणून विशिष्ट घटकाने तीला नेहमीच कमी लेखण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. 
अस्सलं लावणी नृत्यचा जर निरिक्षण केलं तर तिच्यातून मानवाच्या मनाच्या सर्व प्रकारच्या भाव भावनाचे नृत्यातून सादरीकरण होते. लावणी ही अस्सल महाराष्ट्राची कला संस्कृती आहे. तीचा गौरव आपण केलाच पाहिजे.

- संतोष जालिंदरराव आदमाने 

Post a Comment

0 Comments