वैजापूर, ता. 29 - अल्पावधीतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील पंचगंगा शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या गळीत हंगामास एक नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे.
या कारखान्याचा हा द्वितीय गळीत हंगाम असणार असून त्याची सुरुवात एक नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्रीक्षेत्र सराला बेट अर्थात गोदाधामचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज व पंचगंगा उद्योग समूहाचे मार्गदर्शक उत्तमराव शिंदे यांच्याहस्ते उसाची मोळी टाकून होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरनारे, नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पंचगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, चेअरमन कुंडलिकराव माने व भाऊराव गायकवाड यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.
0 Comments