news today, घायगाव शिवारात दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

वैजापूर, ता.28 – गंगापूर मार्गावरील घायगाव शिवारात रविवारी रात्री झालेल्या दुचाकी अपघातात वैजापूर येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.26) रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास घडली. प्रदीप अशोक काळे (28 वर्ष) आणि अमोल सुनिल गोरे (21 वर्ष) दोघे रा.आदिवासी वसाहत, वैजापूर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे रविवारी रात्री दुचाकीने वैजापूरहून गंगापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते. दरम्यान, घायगाव शिवारात त्यांच्या दुचाकीचा डिस्क ब्रेक अचानक जाम झाल्याने दुचाकीचा ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.

स्थानिक नागरिकांनी तात्काळ दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती प्रदीप काळे यास मृत घोषित केले. अमोल गोरे याला प्रकृती गंभीर असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु उपचारादरम्यान रात्री दोनच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला.
या घटनेची नोंद वैजापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments