गारज येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा व नागरी सत्कार सोहळा संपन्न ..
प्रभाकर जाधव
---------------------------
गारज, ता 02 - गारज ता वैजापूर येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा व माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची छत्रपती संभाजीनगर लोकसभा प्रमुखपदी तर बाबासाहेब पाटील जगताप यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल बोरसर शिवसेना सर्कलच्यावतीने नागरी सत्कार व शिवसेना मेळावा रविवारी (ता.02) आमदार रमेश बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. गारज येथील नटराज मित्र मंडळ व्यासपीठावर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यकर्ता मेळावा उपयोगी ठरणार असल्याने जिल्हा परिषद बोरसर सर्कल व पंचायत समितीच्या मणूर व राहेगाव गणातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूकांनी भाऊगर्दी करुन आमदारासमोर आपापले मत मांडले..स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्याने स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे असेही इच्छुक उमेदवारांचे सूर निघाले.
आमदार रमेश बोरणारे यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहे..त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांचा योग्य तो निर्णय होईल.. आमदार बोरणारे पुढे म्हणाले की, वैजापूर शहरांसाठी 312 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून शहरात मोठ्याप्रमाणात विकास कामे झाली आहेत. त्यात शादी खाना, प्रत्येक समाजासाठी मंगल कार्यालय, सामाजिक सभागृह , कोर्टाची भव्य इमारत , महापुरुषांचे पुतळे सुशोभीकरण, नव्याने मंदिरे , दशक्रिया विधी घाट आदीसह मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. म्हणून एकदा नगरपरिषद ताब्यात द्या संपूर्ण शहरचा चेहरा मोहरा बदलून टाकेन..विकास काय असतो ते दाखवूनच देऊ.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकतेच संभाजीनगर जिल्ह्यासाठी 498 कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यात 94 कोटी रुपये एकट्या वैजापूर साठी खेचून आणले आहे.1 लाख 24 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन दिवसात अनुदान जमा होणार असल्याचेही आमदार बोरनारे यांनी यावेळी सांगितले.
या मेळाव्यास माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सभापती रामहरी जाधव, तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके ,माजी उपसभापती राजेंद्र मगर आनंद निकम, दिनकर पवार, सजन शिंदे, अनिल भोसले, उत्तम निकम , रिखब पाटणी, गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, राजेंद्र चव्हाण , प्रशांत शिंदे, सरपंच शारदा सरोवर, उपसरपंच दशरथ सरोवर, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष भरत कदम,उपतालुका प्रमुख पंढरीनाथ कदम, विभाग प्रमुख प्रभाकर जाधव, उपतालुकाप्रमुख नरेंद्र सरोवर, सुनील शेळके, संतोष सरोवर, विठ्ठल पगार, शाखा प्रमुख गोरख चव्हाण, निवृती जाधव, मनुरचे सरपंच नितीन साळुंके, चेअरमन राजीव साळुंके, झोलेगावचे सरपंच जनार्दन काकडे, बाभुळगावचे उपसरपंच बाळकृष्ण तुपे, अवधूत ठुबे, विठ्ठल दरेकर, बाबासाहेब तुपे, तातेराव तुपे, राजु दरेकर, हभप राधाजी सरोवर आदींसह बोरसर सर्कलमधील मनुर, पोखरी, बाभुळगाव, पाथरी, खिर्डी, मालेगाव, भोकरगाव, बायगाव, झोलेगाव,लाखनी, मांडकी, राहेगाव या गावातील कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments