news today, 1 जुलैपर्यंतच्या यादीत नाव असले तरच मतदान ; निवडणूक आयोगाचे प्रतिज्ञापत्र

मुंबई, ता. 02 - मतदार यादीत नाव टाकण्याचा किंवा डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांची यादी तयार आहे.1 जुलै2025 पर्यंत ज्यांचे यादीत नाव आहे तेच मतदान करू शकतील व निवडणूक लढवू शकतील.,असे प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात सादर केले आहे.

आयोगाचे वकील सचिंद्र शेट्ये यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्य निवडणूक आयोगाला किंवा त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्याला मतदार यादीत नाव टाकण्याचा किंवा डिलीट करण्याचा अधिकार नाही.आगामी निवडणुकांसाठी मतदार यादीचा कट ऑफ डेट 1 जुलै 2025 ठरली आहे.त्यानुसारच हे मतदान होईल.असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

आळंदी नगरपरिषद यादीत नाव टाकण्याचा अर्ज फेटाळल्याने संदीप रासकर यांनी ही याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत सुट्टीकालीन न्या.अमित जामसंडेकर यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सादर झालेल्या या प्रतिज्ञापत्राची नोंद करून घेत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.

अपील करण्याची मुभा ...
मतदार यादीतून नाव डिलीट झाले असल्यास अपील करण्याची तरतूद आहे.असेही ॲड.शेट्ये यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. 

Post a Comment

0 Comments