या हंगामात 12 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट..
कमलाकर रासने
-----------------------------
महालगाव, ता.03 - : महालगांव येथील पंचगंगा शुगर अँड पावर प्रा.लि. कारखान्याचा द्वितीय बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजया दशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता.02) मोठ्या उत्साहात पार पडला. हा समारंभ कारखान्याचे चेअरमन प्रभाकर उत्तम शिंदे यांच्याहस्ते पार पडला.
या प्रसंगी आमदार रमेश पाटील बोरणारे, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, गंगापूर साखर कारखान्याचे चेअरमन कुंडलिकराव माने, राष्ट्रवादी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव बनकर, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, शिवसेना उपतालुका प्रमुख डॉ. प्रकाश शेळके, विजय पवार, संभाजी डांगे, आबासाहेब काळे, उपसरपंच सुरेश आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.
या गळीत हंगामात कारखान्याने 12 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यानुसार तयारी सुरू असल्याची माहिती कारखान्याच्यावतीने देण्यात आली.
कारखान्याचे संचालक उत्तमराव शिंदे, बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब शिंदे, कार्यकारी संचालक विवेक शिंदे, भाऊराव गायकवाड, कॅप्टन प्रशांत माने, सचिन माने, प्रबोध शिंदे, तेजस शिंदे अभियंते, व्यवस्थापक गणेश गंगणे, चिफ केमिस्ट अजय खाटीक, अनिल गायकवाड, डिस्लरी व्यस्थापक शितल तवर, शेतकी विभागप्रमुख संजय गव्हाणे, व्यवस्थापक संदिप शेळके, स्टोर मॅनेजर नानासाहेब गोरे, अभियंता नितेश तांबे, इलेकाट्रीक अभियंता उंडे साहेब, मनोज पिंपळलकर, ॲड.थोरात यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच उस उत्पादक शेतकरी मोठ्यासंख्येने हजर होते.
0 Comments