news today, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शेतकऱ्यांना दीड हजार कोटींच्या कर्जमाफीचा प्रस्ताव ; बँकेच्या वार्षिक सभेत ठराव

श्रीरामकृष्ण उपसा जलसिंचन योजना जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठीही पाठपुरावा करणार ...

छत्रपती संभाजीनगर, ता.03 - जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी यासाठी छञपती संभाजीनगर जिल्हयातील शेतकऱ्यांना 1 हजार 582 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा ठराव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.  लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सरकारकडे पाठपुरावा करण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला.असा ठराव घेणारी ही राज्यातील पहिलीच जिल्हा सहकारी बँक आहे.

बँकेच्या मुख्यालयात 29 सप्टेंबर रोजी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. बँकेचे कार्यकारी संचालक मुकुंद मिरगे यांनी प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीची तसेच आर्थिक स्थिती व विषयपत्रिकेचे वाचन केले. अध्यक्षीय समारोपात अर्जुन गाढे यांनी सभासदांसमोर 2024 - 25 मधील बँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला. या वर्षात 22 कोटी 87लाख निव्वळ नफा झाला असून, बँकेच्या 3137.89 कोटीच्या ठेवी असून एनपीएचे 
4.69 टक्के प्रमाण असल्याचे सांगितले. 

आ.अब्दुल सत्तार व अंबादास दानवे यांनी मांडल्या सूचना...

आ.अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीच्या ठरावासोबतच श्रीरामकृष्ण उपसा जलसिंचन योजना ही जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.बँकेचे संचालक अंबादास दानवे यांनी पीककर्ज वाटप करण्यासाठी नवीन सभासदांना कर्ज वाटप धोरण ठरविण्यात यावे,अशी सूचना केली.

या वार्षिक सर्वसाधारण सभेस शेतकरी सभासदांसह अध्यक्ष अर्जुनराव गाढे, उपाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर, आ.रमेश पाटील बोरणारे, संचालक कृष्णा पाटील डोणगांवकर, डॉ.दिनेश परदेशी, आप्पासाहेब पाटील, जावेद पटेल, जगन्नाथ काळे, प्रभाकर काळे, रामहरी जाधव, डॉ.सतीश गायकवाड,मनोज राठोड, ॲड. विशाल कदम, जयराम साळुंके, गोकुळसिंग राजपूत, केशवराव तायडे, देविदास पालोदकर, रमेश पाटील डोणगांवकर, एस. वाय डकले, सहकार बँक सोसायटी चेअरमन विश्वासराव गाढे,सरव्यवस्थापक अजय मोटे, अण्णासाहेब वडेकर आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments