news today, वैजापूर शहरात धम्मचक्र अनु प्रवर्तन दिन उत्साहात

वैजापूर, ता.03 - शहरात धम्मचक्र अनु परिवर्तन दिन गुरुवारी (ता.02) उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात शहरातील सर्व थरातील नागरिकांनी एकत्र येऊन भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महिला वर्गाने बुद्ध वंदना सादर केली व धम्मचक्र अनु प्रवर्तन दिनानिमित्त घोषणा देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामाचा जयघोष केला .या प्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संचालक प्रशांत त्रिभुवन, विलास त्रिभुवन, राजेश गायकवाड, जीवन पठारे, प्रमोद पठारे ,आबासाहेब कसबे, साहेबराव पडवळ, सेवानिवृत्त .प्रा.डी.एस.गायकवाड, जयप्रकाश बोरगे, रामदास वाघ, संतोष त्रिभुवन, दिलीप अनर्थे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, ताराचंद त्रिभुवन, ज्ञानेश्वर सिरसाट, श्री,गणवीर यांच्यासह महिला मंडळ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सूत्र संचलन सुनिल त्रिभुवन यांनी केले. राजेश गायकवाड यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments