news today, वसंत क्लब वैजापूरतर्फे पुरग्रस्तांसाठी 1 लाख रुपयांची मदत

वैजापूर, ता.03 - जिल्ह्यासह वैजापूर शहर व तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना पूर येऊन शेती पिकांसह घरे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना मदत व्हावी यासाठी वसंत क्लब वैजापूर या संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाख रुपयांचा मदत निधी शुक्रवारी (ता.03) देण्यात आला. उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड याच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
 
उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांना मदतीचा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द करताना वसंत क्लबचे उपाध्यक्ष डॉ.व्ही.जी.शिंदे, सचिव जफर खान, सहसचिव डॉ.संतोष गंगवाल ...

यावेळी क्लबचे उपाध्यक्ष डॉ.व्ही.जी.शिंदे, सचिव जफर खान, सहसचिव डॉ. संतोष गंगवाल यांच्यासह कार्यकारिणी सदस्य मेजर सुभाष संचेती, ॲड. बाबुराव परदेशी, कय्यूम सौदागर, भगवानसिंग राजपूत, ॲड. संजय बत्तीसे, क्लबचे व्यवस्थापक वसंतराव कदम, सागर अस्वले आदी यावेळी उपस्थित होते.

वसंत क्लब या संस्थेतर्फे नेहमीच सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. पूरग्रस्तांना मदत व्हावी म्हणून यावेळीही क्लबतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाख रुपयांचा निधी डिमांड ड्राफ्टद्वारे देण्यात आला. असे क्लबचे उपाध्यक्ष डॉ.व्ही. जी.शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments