news today, रोटेगांव स्थानकावर एक्स्प्रेस रेल्वे थांबाव्यात ; द.म.रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन

वैजापूर ता.21 -  तालुक्यातील रोटेगांव रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी वैजापूर शहरातील नागरिकांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

   रोटेगाव रेल्वे स्टेशन अधीक्षक सुभाष छापरिया यांना           नांदेडच्या 12 जून बैठकीसाठी मागणी निवेदन देतांना         प्रवासी...

पुढील महिन्यात 12 जून रोजी द.म.रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांनी या विभागातील खासदारांची  रेल्वे प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. त्याअनुषंगाने येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र पिल्दे, ॲड.
धरमसिंह राजपूत, जयसिंह राजपूत, धोंडीरामसिंह राजपूत  यांच्या उपस्थितीत रोटेगाव रेल्वे स्टेशन अधीक्षक सुभाष छापरिया यांना गुरुवारी (ता.21) निवेदन देऊन 12 जून रोजी होणाऱ्या रेल्वे प्रश्नांसंदर्भात आयोजित खासदार व रेल्वे अधिकारी यांच्या बैठकीत या निवेदनातील मागण्या मांडण्याविषयी नांदेड विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले .

छापरिया यांनी हे निवेदन स्वीकारून तात्काळ नांदेड अधिकाऱ्यांना पाठविण्याचे आश्वासन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, रोटेगाव रेल्वे स्टेशनपासून तीन कि.मी.अंतरावर वैजापूर हे जिल्ह्यातील सर्वात मोठे तालुक्याचे ठिकाण आहे, येथून हजारो प्रवाशी, व्यापारी, उद्योजक, नौकरदार व रुग्ण पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, जालना या शहरात दररोज ये-जा (अप-डाऊन) करतात. तसेच वैजापूर हे दोन तालुक्याचे मुख्यालय असून येथे जिल्हा सत्र न्यायालय, कृषी,भूमी अभिलेख विभागीय कार्यालय आहे. दोन वैद्यकीय महाविद्यालय, तीन कृषी महाविद्यालय, तीन अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. नर्सिंग महाविद्यालय, मोठी व्यापार पेठ तसेच अनेक विभागाचे मुख्यालय आहेत, जवळच साखर कारखाना आहे. औद्योगिक वसाहत होऊ घातलेली आहे. अशा सुविधा असलेल्या शहरासाठी रोटेगाव रेल्वे स्टेशनवर पुढील रेल्वे गाड्याना थांबे देऊन हजारो प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी असे निवेदनात नमूद केले आहे. 

रेल्वे न.१७६३०-नांदेड-पुणे -हडपसर एक्सप्रेस, रेल्वे न.१७६२९-हडपसर-पुणे-नांदेड,.रेल्वे न.१७२३१-नरसापूर -नागरसोल एक्सप्रेस, रेल्वे न.१७२३२-नागरसोल-नरसापूर रेल्वे न.१२०७२-हिंगोली-सीएसटी जनशताब्दी एक्सप्रेस, रेल्वे न.१२०७१- सीएसटी-हिंगोली, रेल्वे न.१२७८७ -नरसापूर-नगरसोल-एक्सप्रेस, रेल्वे न.१२७८८-नगरसोल --नरसापूर, रेल्वे न.१२७१५-नांदेड-अमृतसर---एक्सप्रेस, रेल्वे न.१२७१६अमृतसर--नांदेड - एक्सप्रेस 

वरील सर्व रेल्वेगाड्या रोटेगाव स्थानकांवरून जातात, पण थांबत नाही. रोटेगाव रेल्वे स्टेशन हे मनमाड-संभाजीनगर मार्गावरील सर्वात जास्त रेल्वेला उत्पन्न देणारे स्थानक आहे. द.म.रेल्वेचे अधिकारी व खासदार यांनी या मागण्याबाबत विचार करून अंमलबजावणी करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.  या प्रसंगी जे.के.जाधव, मंजुषा ढाकरे, आकाश चौतमल, शिरीष चव्हाण यांच्यासह बहुसंख्य प्रवाशी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments