news today, औषध विक्रेत्यांचे मुकमोर्चा काढून आंदोलन ; मेडीकल दुकाने बंद असल्याने रुग्णांची गैरसोय

वैजापूर, ता .21 - शहर व ग्रामीण भागातील सर्व मेडिकल दुकाने बुधवारी बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. औषध विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारत दिवसभर दुकाने बंद ठेवली.तसेच वैजापूर तालुका केमीस्ट ॲन्ड ड्रॅगीस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातून सकाळी मुक मोर्चा काढला. ऑनलाईन औषध विक्री बंद करावी,.कार्पोरेटसद्वारे अव्यवसायिक डिस्काउंट बंद करा.या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आपल्या मागण्यासाठी मेडीकल दुकानदारांनी शहरात मुक मोर्चा काढला...

या आंदोलनातमुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या पालकांची मोठी गैरसोय झाली. सकाळपासूनच अनेक नागरिक औषधे घेण्यासाठी मेडिकल दुकानांवर पोहोचले. मात्र दुकाने बंद असल्याचे पाहून त्यांना परतावे लागले. विशेषतः रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचे रुग्ण व नियमित औषधे घेणाऱ्यांना औषधी मिळाली नाहीत. रुग्णालयांमध्येही परिस्थिती गंभीर बनली होती. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागली. नागरिकांनी प्रशासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, औषध विक्रेत्यांच्या संघटनेने मागण्याचे निवेदन तहसीलदार सुनील सावंत यांना दिले.


Post a Comment

0 Comments