वैजापूर, ता.22 - महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वैजापूर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज संपन्न झाली.
या बैठकीत मतदारसंघातील विकासकामांचा आढावा, संघटनात्मक मजबुती, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर उपाययोजना तसेच आगामी राजकीय आणि सामाजिक उपक्रमांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षवाढीसाठी प्रत्येकाने जनतेमध्ये अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.
शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, विकासकामांना गती देणे आणि वैजापूर मतदारसंघ अधिक सक्षम करण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीस जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आ.रमेश पाटील बोरणारेत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी आमदार अण्णासाहेब माने, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, अमोल बोरनारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments