वैजापूर ता.21 - शहरातील देशपांडे गल्ली येथील रहिवाशी सेवानिवृत्त नायब तहसीलदार रमेश श्यामराव भालेराव यांचे बुधवारी (ता.20) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय.62 वर्ष होते.
वैजापूर नगरपालिकेच्या भांडार विभागाचे सहाय्यक दत्ता भालेराव यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित मुलगा व मुलगी,सून नातवंडे असा परिवार आहे.
स्व.रमेश भालेराव यांच्या पार्थिवावर दुपारी अमरधाममध्ये अंतिम संस्कार करण्यात आले..याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ..दिनेश परदेशी, नगरसेवक लिमेश वाणी, सोनू राजपूत,अशोक पवार खंडाळकर, भगवानसिंह राजपूत, रामचंद्र पिल्दे, डॉ,अश्विन जोशी, प्रमोद कुलकर्णी, राजू मेढे, हरीश लालसरे, धोंडीरामसिंह राजपूत, योगेश पुंडे, दीपक त्रिभुवन, अरुण कुलकर्णी, देविदास देशपांडे, गिरीश भालेराव, महेश शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
0 Comments