news today, वैजापूर नगरपालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांना बक्षीस वितरण


वैजापूर, ता.03 - गणेशोत्सवात ज्या गणेश मंडळांनी समाजप्रबोधनपर उपक्रम घेतले व पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा केला.डीजे लावले नाही अशा गणेश मंडळांना वैजापूर नगरपालिकेच्यावतीने बक्षीस व सन्मान पत्राचे वितरण माजी नगराध्यक्ष साबेर खान, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी व पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्याहस्ते शुक्रवारी (ता.03) करण्यात आले.

पालिकेच्या फुले आंबेडकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, गणेश मंडळ प्रतिनिधी गौरव दोडे, राजू काझी, ज्ञानेश्वर मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रथम क्रमांक - कुबेर प्रतिष्ठाण गणेश मंडळ (11 हजार रुपये),
द्वितीय क्रमांक - श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक गणेश मंडळ - ( 7 हजार 500 रुपये), तृतीय बक्षीस विभागून मोरया गणेश मंडळ व पोलीस स्टेशन गणेश मंडळ (प्रत्येकी 5 हजार रुपये) तसेच उत्कृष्ट सफाई कर्मचारी संतोष त्रिभुवन( 3हजार रुपये),द्वितीय  संजय त्रिभुवन,( 2 हजार रुपये) ,तृतीय जमीर कुरैशी (1 हजार 500 रुपये) वरीलप्रमाणे बक्षिसे व सन्मान पत्र प्रदान करण्यात आली. या प्रसंगी माजी नगराध्यक्षा साबेर खान, माजी नगराध्यक्षा शिल्पा ताई परदेशी, मुख्याधिकारी भागवत बिघोत, गणेश मंडळ प्रतिनिधी गौरव दोडे यांची समयोचित भाषणे झाली. 

कार्यक्रमास अशोक पवार, श्रावण चौधरी,पर्यवेक्षक बी.बी.जाधव यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले, आभार बी.बी.जाधव यांनी मानले. विजेत्या गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments