news today, समृध्दी महामार्गावर भरधाव ट्रकची हार्वेस्टरला धडक ; दोन जण गंभीर जखमी

ट्रक पाठीमागून धडकला अन् हार्वेस्टरने पेट घेतला..

वैजापूर, ता .09 - भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने हार्वेस्टरला पाठीमागून धडक दिल्याने हार्वेस्टर चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर हार्वेस्टरने पेट घेतला. हा अपघात समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात मंगळवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास  घडला. 

.   ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने हार्वेस्टरने पेट घेतला...

भरत पाटील बुवा बिन्नर हा चालक मुंबई येथून ट्रक (एम.एच.15 एफ.व्ही. 3025) घेऊन नागपूर येथे जात होता. तसेच वैजापूर येथून हार्वेस्टर छत्रपती संभाजीनगर येथे जात होता.समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात ट्रक चालकाला झोप लागल्याने तो पाठीमागून हार्वेस्टर वर जाऊन धडकला. या अपघातात हार्वेस्टर चालक भागवत बाळासाहेब पवार (29 वर्ष) व जसपाल (38 वर्ष) रा. जेऊर ता कन्नड हे दोघे गंभीर जखमी झाले तसेच हार्वेस्टरने पेट घेतला.
घटनेची माहीती मिळताच पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक थोरात, हवालदार किसन गवळी,सुरक्षा रक्षक संजय लोहार, दिनेश कोल्हे, डेडवाल , कैलास बहुरे यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. याशिवाय वाहतूक सुरळीत करून जखमींना उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Post a Comment

0 Comments