हसन सय्यद
-----------------------------
लोणी खुर्द, ता.08 - वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे सायंकाळी अर्ध गोलाकार इंद्रधनुष्य दिसून आल्याने मनमोहक चित्र नागरिकांना पाहावयास मिळाले. सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे. पावसाळ्यात कधी तरी इंद्रधनुष्य दिसतं. इंद्रधनुष्य दिसणं हा एक अनोखा अनुभव असतो. निसर्गातल्या निवडक चमत्कारांमध्ये त्याचा समावेश होतो. जेव्हा आपण इंद्रधनुष्य पाहतो तेव्हा ते अर्धवर्तुळाकार दिसतं; पण इंद्रधनुष्य पूर्णपणे गोलाकार असते, असे जुन्या पिढीतील वय वृद्ध लोकांकडून माहिती मिळते.
पाऊस पडल्यानंतर आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहायला मिळतं. निसर्गाची ही सुंदर निर्मिती पावसानंतर पाहायला मिळण्यासारखा छान अनुभव दुसरा कोणता नसेल. पण, मेख अशी असते की, अनेकदा काही सेकंदासाठी किंवा मिनिटाभरासाठी इंद्रधनुष्य आकाशात दिसतं आणि नाहीसं होतं. पण, लोणी खुर्द गावाजवळ बराच वेळ पहावयास मिळाले.
इंद्रधनुष्य हा प्रत्यक्षात एक पूर्ण गोल असतो, पण जमिनीवरून पाहताना पृथ्वीचा क्षितिज खालचा अर्धा भाग झाकतो. त्यामुळे ते आपल्याला फक्त अर्धवर्तुळाकार किंवा कमान आकाराचे दिसते.
संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य पाहण्याचे मार्ग....
विमानातूनः तुम्ही विमानातून प्रवास करत असाल, तेव्हा तुम्हाला संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य दिसू शकते. यासाठी, तुमच्या समोर सूर्य आणि मागे (ज्या दिशेने इंद्रधनुष्य तयार होत आहे) मोकळे दृश्य असणे गरजेचे आहे.
उंच ठिकाणाहूनः उंच डोंगर, गगनचुंबी इमारत किंवा इतर कोणत्याही उंच ठिकाणावरून पाहिल्यास, तुम्ही इंद्रधनुष्याचा मोठा भाग किंवा काही विशिष्ट परिस्थितीत संपूर्ण गोल देखील पाहू शकता.
कृत्रिमरित्याः उन्हाळ्याच्या दिवसांत, सूर्य तुमच्या मागे असताना बागेच्या नळीतून बारीक पाण्याची फवारणी करून तुम्ही स्वतःच छोटासा आणि कधीकधी पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य तयार करू शकता,
0 Comments