सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वकील राकेश किशोर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करून निषेध
महालगाव ता.08 - सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महालगाव येथे बुधवारी (ता.08) सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर वकील राकेश किशोर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश गलांडे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब झिंजुर्डे, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष डॉ. प्रकाश शेळके, मंगेश गायकवाड, शाईनाथ आहेर, देविदास जाधव, अंबादास जाधव, बाजार समिती सदस्य रजनिकांत नजन, नानासाहेब काळे, उपसरपंच सुरेश आल्हाट, कैलास बनकर, ग्रामपंचायत सदस्य संपत जाधव, सतिष आल्हाट, शेख मुसाभाई, नवनाथ गायकवाड, राहुल गायकवाड, विकास जाधव, आरुण सोनवणे, किरण आल्हाट, रभाजी आल्हाट, ,सोपान हुमे, आण्णा टेमकर, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments