news today, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये व सरसकट कर्जमाफीसाठी ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

छञपती संभाजीनगर, ता.08 - 31 हजार 500 कोटीच्या पॅकेज मधून शेतकऱ्यांमध्ये खोटा नरेटीव्ह पसरण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. 

शेतकऱ्यांची मूळ मागणी हेक्टरी सरसकट 50 हजार रुपये नुकसान भरपाई, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, पिक विम्याचे निकष पूर्ववत करावे. पुरात वाहून गेलेल्या घरांची, जनावरांची व दुकानांची आर्थिक भरपाई मुबलक प्रमाणात मिळावी  असल्याने  या मागण्यासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने बुधवारी (ता.08) संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

31 हजार 500 कोटींच्या पॅकेज मधून शेतकऱ्यांमध्ये खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. असे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी बोलताना म्हणाले.

या निदर्शने आंदोलनात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, विष्णू जाधव, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले व मीना फसाटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

Post a Comment

0 Comments