वैजापूर, ता.08 - आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुधवारी (ता.08) वैजापूर पालिकेच्या नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. पालिकेच्या 12 प्रभागातील 25 सदस्यपदासाठी काढण्यात आलेल्या या आरक्षण सोडतीत 7 जागा (सर्वसाधारण प्रवर्ग), 7 जागा (सर्वसाधारण महिला), 3 जागा (नागरिकांचा मागास प्रवर्ग), 3 जागा (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), 2 जागा (अनुसूचित जाती पुरुष), 2 जागा (अनुसूचित जाती महिला) व 1 जागा (अनुसूचित जमाती महिला) याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले.
पंचायत समितीच्या विनायकराव पाटील सभागृहात ही नगरसेवकपदाची ही आरक्षण सोडत पार पडली. उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या आरक्षण सोडतीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सोडतीत प्रभागनिहाय नगरसेवक पदासाठीच्या आरक्षित जागा...
प्रभाग क्रमांक - 01
(अ) अनुसूचित जमाती (ST महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 02
(अ) अनुसूचित जाती (SC महिला),
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 03
(अ) अनुसूचित जाती (SC महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक -04
(अ) नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (OBC)
(ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक - 05
(अ) सर्वसाधारण (महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 06
(अ) नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (OBC महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 07
(अ) अनुसूचित जाती (SC)
(ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक - 08
(अ)नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (OBC महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 09
(अ)नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (OBC)
(ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक - 10
(अ) सर्वसाधारण (महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 11
(अ) नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (OBC)
(ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक - 12
(अ) अनुसूचित जाती (SC)
(ब) नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (OBC, महिला)
(क) सर्वसाधारण (महिला)
0 Comments