छञपती संभाजीनगर, ता.07 - संविधानाच्या समर्थनार्थ 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार' पक्षाच्यावतीने छञपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासमोर संविधान सन्मान आंदोलन करण्यात आले.
पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना आ.रोहित पवार म्हणाले की, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा ज्यांनी प्रयत्न केला. ती मनुवादी प्रवृत्ती आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या बुद्धीमत्तेच्या बळावर सर्वोच्च न्यायासनावर जातो त्यांची खरी पोटदुखी आहे. त्यांच्यावरील हल्ल्याचा हा प्रयत्न म्हणजे लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे. या मनुवादी प्रवृत्तीकडून कायमच लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. याला वेळीच रोखलं नाही तर ही प्रवृत्ती मोकाट सुटेल आणि यात लोकशाही आणि संविधान धोक्यात येऊ शकेल. त्यामुळे या प्रवृत्तीच्या विरोधात आणि संविधानाच्या सन्मानार्थ ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्यावतीने आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संविधान सन्मान आंदोलन केले.असे आ.रोहित पवार म्हणाले.
0 Comments