मुंबई, ता.07 - राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा सर्वांगीण आढावा घेऊन राज्य सरकारने व्यापक मदत पॅकेज जाहीर केले आहे. 29 जिल्ह्यांतील 253 तालुके आणि 2059 मंडळांमधील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. पिकांचे नुकसान जिथे झाले आहे, तिथे 650 मि.मी. पावसाची अट न ठेवता मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरडवाहू शेतकऱ्यांना 18 हजार 500 रुपये हेक्टरी, हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना 27 हजार प्रति हेक्टरी, बागायती शेतकऱ्यांना 32 हजार ५500 हेक्टर मदत दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना 17 हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे.
मदतीचे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे ...
पिकांचे नुकसान, खरडून गेलेली जमीन, मृत व्यक्तींना मदत, जखमींना मदत, इस्पितळातील उपचारखर्च या सर्वांचा समावेश.
घरांचे नुकसान...
• पूर्णतः पडझड झालेल्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घरासाठी पूर्ण मदत
• डोंगरी भागातील घरांसाठी अतिरिक्त दहा हजार रुपये
• अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी तसेच झोपड्यांसाठीही आर्थिक मदत
जनावरांचे नुकसान...
• दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ₹३७,५०० पर्यंत मदत
• एनडीआरएफची तीन जनावरांची मर्यादा रद्द, आता प्रत्येक मृत जनावरासाठी मदत दिली जाईल
दुकानदारांसाठी मदत ...
• नुकसान झालेल्या दुकानांसाठी 50,00 पर्यंत आर्थिक सहाय्य
राज्य शासनाचा प्रयत्न – ही सर्व मदत दिवाळीपूर्वी शेतकरी आणि नागरिकांच्या हातात पोहोचवणे.
0 Comments