news today, मराठवाड्यातील पूरग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये भरपाई आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी - उध्दव ठाकरे

मुंबई, ता.07 - मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून मराठवाड्यातील शेतकरी त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. 
राज्यात 8 तारखेला येणाऱ्या पंतप्रधानांनी उगाच थातूरमातूर घोषणा करून जाऊ नये.अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

राज्यातील शेतकरी अतिवृष्टी व पुरामुळे उध्वस्त झाला असून खरीप पिके वाया गेली आहेत.राज्य सरकारने अडीच कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, ते पुरेसे नाही. पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे. 
संपूर्ण मराठवाडा आजही चिखलात आणि पाण्यात आहे. पिके, घरे पशुधन तर गेलेच ; पण जमीन साफ खरवडून गेली त्यावर किमान दोन पिढ्या पीक घेता येणार नाही. अतिवृष्टी व पुराच्या पाण्याचा 40 लाख शेतकऱ्यांना फटका बसला असून पंतप्रधान मोदी यांनी बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची थेट मदत आणि कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी.असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments