जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर गट आणि गणांचे आरक्षण कधी निघणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. आता राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (ता..01) आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व जमाती करता जागा निश्चित करण्यासाठी 6 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येईल.10 ऑक्टोबरपर्यंत राखीव जागांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल. जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडती संदर्भातील सूचना प्रसिध्द करतील, 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना मांडता येतील. 31 ऑक्टोबरपर्यंत प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिध्द केले जाईल.
0 Comments