news today, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ..

वैजापूर, ता .09 - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्षं सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के.उपाध्याय यांनी सुनावली. मयुर सोमनाथ सोनवणे (37 वर्ष) रा सराला गोवर्धन ता. श्रीरामपूर असे आरोपीचे नाव आहे.

मयूर सोनवणे याने वैजापूर तालुक्यातील भालगाव येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस 3 एप्रिल 2023 रोजी सकाळी नऊ  वाजता मुलीचे अपहरण केले. तसेच अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. आरोपी हा विवाहीत असून त्याला दोन मुले आहेत असे असताना त्याने अल्पवयीन मुलीला पळवून नेले. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बनसोडे यांनी तपास करुन आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा सरकारी वकील कृष्णा गंडे यांनी काम पाहिले. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून काॅन्सटेबल एस.बी.गायकवाड यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments