news today, वैजापूर येथे शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती ; भाजपचीही मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक

वैजापूर, ता.09 - पालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून  राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पालिका निवडणुकीत युती राहील की नाही, महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढवणार का नाही हेही पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वैजापूर शहरात शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत तर भाजपचीही मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आमदार रमेश पाटील बोरणारे, छञपती संभाजीनगर जिल्हा सहसंपर्कप्रमुख माजी आमदार अण्णासाहेब पाटील माने, लोकसभा प्रमुख माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता.09) सकाळी 9 ते 1 वाजेच्या दरम्यान शिवसेना प्रचार कार्यालय, मुरारी पार्क येथे घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना पक्षातर्फे करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही आजच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली आहे. राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, गंगापूरचे आमदार तथा निवडणूकप्रमुख प्रशांत बंब, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात
दाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणीही यावेळी करण्यात येणार आहे. लाडगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण लॉन मध्ये दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे.या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.








Post a Comment

0 Comments