वैजापूर, ता .19 - जागतिक रेडिओलॉजी दिनानिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी वैद्यकीय अधीक्षक एस.के.मुंढे व जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत क्ष-किरण, सोनोग्राफी, नेत्र तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना सखोल माहिती देण्यात आली. प्रथम क्ष-किरण यंत्राचा शोध लावणारे डॉ.विल्यम रोन्टजेन यांच्या प्रतिमेला अभिवादन करून एका रोपट्याला पाणी दिले.
शीतल बोढरे व किशोर वाघुले यांनी क्ष-किरण व सोनोग्राफी या यंत्राचे शोधक व त्यांच्या योग्य वापराबाबत माहिती दिली. धोंडीराम राजपूत यांनीही सोनोग्राफीच्या व क्ष किरण च्या योग्य वापराबाबत उपस्थित रुग्णांना माहिती दिली व आरोग्य हीच संपत्ती समजून काळजी घेण्याचे आवाहन केले.
देहदान व अवयव दान करण्याचा संकल्प केलेल्या व फॉर्म भरलेल्या रुग्णांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रोन विद्या महाडकर, परिसेविका विजया जंगम, अधिपरिचारिका शीतल बोढरे, ओ.टी.विभाग प्रमुख रुक्मिणी गवई, निवेदिता शिंत्रे, शेख मुन्नी, श्याम उचित, विजय पाटील, शशिकांत पाटील, नितेश साळुंके, नेत्र विभाग
प्रमुख डॉ.साळे, मंगेश मापारी यांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचलन किशोर वाघुले यांनी केले व आभार श्याम उचित यांनी मानले.
0 Comments