news today, भाजपचे मजीद कुरेशी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

वैजापूर, ता.23 - वैजापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी यांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या संपर्क कार्यालयात आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.22) हा प्रवेश झाला. 

या प्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, हमीदशेठ कुरेशी, रहीम खान, हाजी खलील मिस्तरी, खालिद कुरेशी आदी उपस्थित होते.
 
मजीद कुरेशी हे गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून सहावेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. पक्षात घुसमट होत असल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात काल प्रवेश घेतला. मजीद कुरेशी यांच्या प्रवेशामुळे पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला काही प्रभागात निश्चितच फायदा होईल.

Post a Comment

0 Comments