news today, शिवसेना (उबाठा) च्या वैजापूर तालुकाप्रमुखपदी मनाजी पाटील मिसाळ

वैजापूर, ता. 23 - शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वैजापूर तालुका प्रमुखपदी मनाजी पाटील मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी ही नियुक्ती केली आहे. 

मनाजी पाटील मिसाळ हे जिल्हा परिषदचे माजी सदस्य असून माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांचे समर्थक म्हणून ओळखले जात. ऐन नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख व शहरप्रमुखांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे पक्षाच्या रिक्त झालेल्या तालुकाप्रमुखपदी मनाजी पाटील मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. मनाजी पाटील मिसाळ हे लासूर भागातील प्रभावी कार्यकर्ते आहेत. शिवसेना पक्षाच्या तालुका प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनाजी पाटील मिसाळ यांचे विठ्ठल पाटील डमाळे, ॲड.रमेश पाटील सावंत, किशोर हुमे, मनोज गायके, अक्षय साठे आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments