वैजापूर, ता.20 - ट्रॅक्टर ट्रालीच्या बनावट विमा पाॅलीसी काढुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आर टी ओ एजंट विरुद्ध बुधवारी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारस पाटणी रा छत्रपती संभाजीनगर असे आरोपीचे नाव आहे.
पाटणी याने नऊ ट्रॅक्टर ट्रालीच्या नोंदणीसाठी प्रस्ताव वैजापूर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात दाखल केले होते.या प्रस्तावासोबत जोडलेल्या विमा पॉलिसी या बनावट असल्याचा संशय उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश विघ्ने यांना आला.या पाॅलीसी न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनी नाशिक कार्यालयाच्या होत्या.त्यामुळे सदर कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला.सदर पाॅलीसी या नकली व बनावट असल्याचे या कार्यालयाने कळवले.
त्यामुळे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश विघ्ने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बनावट कागदपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पारस पाटणी विरूद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटणी या आर टी ओ एजंटने आतापर्यंत जवळपास दहा हजार वाहनांची नोंदणी केल्याचा संशय आहे.एका विमा पाॅलीसी साठी तो शेतकऱ्यांकडून चार ते पाच हजार रुपये घेत होता.त्यामुळे या बनावट पाॅलीसी प्रकरणात त्याने कोटी रुपये कमावले आहे.
फोटो सह
0 Comments