वैजापूर नगरपालिका निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने भाजप युतीतून वेगळे होत पालिका निवडणुकीत आपले उमेदवार जाहीर करून नगराध्यक्षपदासह सर्व बारा प्रभागात उमेदवार उभे केले आहेत.
आ.रमेश पाटील बोरणारे यांचे लहान बंधू संजय पाटील बोरणारे हे शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून नगरसेवकपदाचे प्रभागनिहाय उमेदवार पुढील आहेत.
प्रभाग क्रमांक 1) शेख मसिरा परवीन, घाटे पारस अंबादास
प्रभाग क्रमांक 2) त्रिभुवन लीलाबाई मधुकर, संदीप नामदेव बोर्डे, प्रभाग क्रमांक 3) त्रिभुवन रश्मी विशाल, शेख मिरान इरफान, प्रभाग क्रमांक 4) जेजुरकर स्वप्नील विष्णू, उचित संगीता राम, प्रभाग क्रमांक 5) चौधरी जयश्री सावन, साबेरखान अमजदखान, प्रभाग क्रमांक 6) भाटिया शिल्पा सागर, खान ताहेर साबेर खान, प्रभाग क्रमांक 7) त्रिभुवन राहुल कारभारी, साळुंके ललिता दीपक,प्रभाग क्रमांक 8) साळुंके सोनल श्रीकांत, पुतळे बाबासाहेब सुखदेव, प्रभाग क्रमांक 9) सय्यद अमीर अली महेबुब अली, घाटे सुरेखा सुरेश, प्रभाग क्रमांक 10) टेके ज्योती ज्ञानेश्वर, कुरेशी शेख हमीद शे.हुसेन, प्रभाग क्रमांक 11) बोरणारे छाया रंभाजी, डोंगरे विजया राजीव, प्रभाग क्रमांक 12) पवार सुनील चिंतामण, ठोंबरे ज्योती शिरीष, सुतवणे साक्षी सुरेंद्र
शहरातील विविध भागात मतदारांशी त्या संपर्क साधून शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत..
शिवसेना शिंदे गटाच्यावतीने आज प्रचाराचा शुभारंभ ही करण्यात आला. शहरातील लक्ष्मीनारायण मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, श्री जगदंबा देवी मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र, श्रीराम मंदिर, नौगाजी बाबा दर्गा, महाराणा प्रताप स्मारक, अहिल्यादेवी होळकर स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, संकट मोचन हनुमान मंदिर रॅली काढून छञपती शिवाजी महाराज स्मारक येथे समारोप करण्यात आला.
या प्रचार शुभारंभ रॅलीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, खुशालसिंह राजपूत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments