news today, मालेगाव तालुक्यात चिमुकलीसोबत घडलेल्या अमानुष घटनेचा वैजापूर सुवर्णकार संघटनेतर्फे निषेध

गुन्हेगारास कठोर शिक्षा देण्यात यावी -  उपजिल्हाधिकारी 
 डॉ. जऱ्हाड यांना निवेदन ..

वैजापूर, ता.20 - मालेगाव तालुक्यात सुवर्णकार समाजातील एका चार वर्षीय चिमुकल्या मुलीसोबत घडलेल्या अमानुष व दुर्दैवी घटनेचा वैजापूर तालुक्यातील सकल सुवर्णकार समाजबांधवांतर्फे निषेध करण्यात आला तसेच चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाव्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. 

उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांना निवेदन देताना सकल सुवर्णकार समाजातील महिला 

उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मालेगांव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकार समाजातील चार वर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने पाशवी बलात्कार करून अत्यंत अमानुषपणे तिची हत्या केली. राक्षसी वृत्तीच्या व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सकल सुवर्णकार समाजाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. या घटनेने महाराष्ट्रातील तमाम सकल सोनार समाजाच्या भावना तीव्र असून गुन्हेगाराविरुध्द कठोर कारवाई करून चिमुकलीला न्याय द्यावा. असे निवेदनात म्हटले आहे.


यावेळी वैजापूर तालुक्यातील सुवर्णकार समाजातील किशोर बिरारी, गिरीष चापनेरकर, मेघा चापानेरकर, मधुकर बिरारी, अरविंद खरोटे, मयुर बिरारी, शरद चापानेरकर, उज्वला चापानेरकर, जितेंद्र चापानेरकर, वडनेरे, दुसाने, दाभाडे यांच्यासह समाजबांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments