news today, व्यापाऱ्यास लुटणारे दोघे अटकेत ; स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई

 वैजापूर, ता.21 - चाकुचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. रायभान साहेबराव मोरे रा जातेगाव जि नाशिक व संदीप दादा काळे रा कोळपेवाडी ता कोपरगाव अशी आरोपींची नावे आहेत.
     

चाकुचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटणाऱ्या दोघांना     स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले.

सुरेशसिंग माधवसिंग  (रा. खारपुर ता. रसुलाबाद जि. कानपुर उत्तरप्रदेश) हें सध्या श्रीरामपूर येथे राहतात. 18 ऑक्टोबर रोजी ते कपडे विक्री करण्यासाठी त्याच्या ताब्यातील दुचाकीवर किरतपुर फाटा ते सुराळा रस्त्यान जात होते. त्यावेळी तीन अनोळखी इसमांनी दुचाकी थांबवुन चाकुचा धाक दाखवून त्यांचा  मोबाईल, रोख रक्कम व दुचाकी तसेच रस्त्यामध्ये पुरणगाव चौफुली येथे प्रतिभा माणिकराव जगताप या महिलेचा मोबाईल हिसकावून पळुन गेले होते. हे आरोपी वैजापूर हद्दीत फिरत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना मिळाली . त्या आधारे पथकाने  पुरणगाव चौफुली ते किरतपुर जाणारे रोडवर जैन मंदीराच्या समोर दोन आरोपींना ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार झाला आहे. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्हयातील  मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
    
पोलीस अधिक्षक डॉ.विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधिक्षक  अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  विजयसिंह राजपुत, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, सुधीर मोटे, पोलीस अंमलदार विष्णु गायकवाड, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे, महेश बिरुटे, संजय तांदळे, योगेश तरमळे, जीवन घोलप यांनी ही कारवाई केली .

 

Post a Comment

0 Comments