हसन सय्यद
-------------------------------
लोणी खुर्द, ता. 07 - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह वैजापूर तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी रोटेगांव एम.आय.डी.सी लवकरात लवकर सुरू करा.आदी मागण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे वीर शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (ता.05) लोणी खुर्द येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिऊर बंगला - नांदगांव रस्त्यावर करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे एक ते दीड तास वाहतुकीची कोंडी झाली होती.
शेतकरी कर्जमाफी, विनायक सहकारी सरकारी कारखाना चालू करावा, वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथील एमआयडीसी
तात्काळ चालू करण्यात यावी, मागील वर्षाचा व चालू वर्षा पिक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात यावा, शिऊर बंगला - नांदगाव रस्ताच्या संथगतीने चाललेल्या नवीन कामामुळे प्रवाशांचे हाल होत असून वातूकीसाठी रस्ता सुरळीत करण्यात यावा. अशा अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
आंदोलन सुरू असतांना धुळे सोलापूर महामार्गवरील शेकडो गाड्या दुतर्फा एक ते दीड तास उभ्या होत्या. रास्ता रोको आंदोलनामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय हाल होतांना दिसून आले. लोणी येथील आठवडी बाजारात येणाऱ्या मालविक्रेत्यांची, दुकानदारांची मोठी अडचण निर्माण झाली होती. सर्वांचे हित लक्षात घेता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलकांनी आपली मागणी लावून धरली होती. वरिष्ठांच्या आश्वासनानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या रास्ता रोको आंदोलनात किशोर मगर, अजय मोटे , बाळू आबा भोसले, प्रकाश बापू ठुबे, बाळा पाटील जाधव,मंगेश साळुंके, योगेश जाधव, चेतन भोपळे, गणेश सोनवणे, जालिंदर नागरुडे, आबासाहेब काळे, आनंद मगर, गणेश निकम, एन. डी .निकम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 Comments