news today, वैजापुरात शिवसेना - भाजपातच होणार चुरशीची लढत ; अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट

वैजापूर, ता .22 - पालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून नगराध्यक्ष पदासाठी 3 व नगरसेवकांच्या 25 जागांसाठी 79 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये शिवसेना-भाजप आघाडीच्या उमेदवारांमध्ये दुरंगी लढत रंगणार आहे.
वैजापूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी 6 जणांनी तर 25 जागांसाठी 210 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु छाननी व अर्ज माघारीनंतर नगराध्यक्ष पदासाठी 3 व नगरसेवकांच्या 25 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉ. दिनेश परदेशी, शिवसेनेचे संजय बोरनारे व काॅंग्रेस आघाडीचे सुभाष गायकवाड हे तिघेजण मैदानात आहेत.

प्रभागनिहाय उमेदवार असे ...

प्रभाग क्रमांक 1 ब- पारस घाटे(शिवसेना), राफे हसन (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), समी शेख (एमआयएम), मुजफ्फर सय्यद (वंचित बहुजन आघाडी), प्रभाग क्रमांक 2 अ- लिलाबाई त्रिभुवन (शिवसेना), मोनाली साळुंके (भाजप), प्रभाग क्रमांक 3 अ- पुजा त्रिभुवन ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), रश्मी त्रिभुवन (शिवसेना), शालू मोटे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), प्रभाग क्रमांक 3 ब- जाबाज खान (वंचित बहुजन आघाडी), जुनेद पठाण (काॅंग्रेस), मिरान शेख (शिवसेना), रियाज शेख (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) प्रभाग क्रमांक 4 अ- स्वप्निल जेजुरकर (शिवसेना), गोकुळ भुजबळ (भाजप), दीपककुमार मालकर (उबाठा शिवसेना), प्रभाग क्रमांक 4 ब- संगीता उचित (शिवसेना), संगीता राजपूत (भाजप), सबिहा शेख ( काॅंग्रेस), प्रभाग क्रमांक 5 अ- जयश्री चौधरी (शिवसेना), पुजा थोडे (भाजप), प्रभाग क्रमांक 5 ब- साबेरखान (शिवसेना), इमरान शेख(भाजप), प्रभाग क्रमांक 6 अ- शिल्पा भाटिया (शिवसेना), दीपा राजपूत (भाजप), अफरीन सय्यद (एमआयएम ), प्रभाग क्रमांक 6 ब- ताहेरखान (शिवसेना), मेहुल पोकर्णे (अपक्ष), अलताफ मोहंमद ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), हितेश रामैय्या ( काॅंग्रेस), प्रभाग क्रमांक 7 अ- दीपक त्रिभुवन (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), राहुल त्रिभुवन (शिवसेना), शाक्यसिंह त्रिभुवन (काॅंग्रेस), सचिन त्रिभुवन (भाजप), प्रभाग क्रमांक 7 ब- ललिता साळुंके (शिवसेना), नीता राजपूत (अपक्ष), सविता चव्हाण (भाजप), प्रभाग क्रमांक 8 अ- लता वाणी (भाजप), सोनल साळुंके (शिवसेना), प्रभाग क्रमांक 8 ब- प्रकाश चव्हाण (भाजप), बाबासाहेब पुतळे (शिवसेना), प्रभाग क्रमांक 9 अ- कैलास आंबेकर (काॅंग्रेस), बिलाल शेख (भाजप), अमिरअली सय्यद (शिवसेना), प्रभाग क्रमांक 9 ब- सुरेखा घाटे (शिवसेना), चित्रा चव्हाण (भाजप), प्रभाग क्रमांक 10 अ- ज्योती जोशी (भाजप), ज्योती टेके (शिवसेना), सुमैय्या शेख (काॅंग्रेस), प्रभाग क्रमांक 10 ब- अकिल कुरेशी ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), हमीद कुरेशी (शिवसेना), यासेर बिनबिलेस (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), शमीम शेख (उबाठा शिवसेना), प्रभाग क्रमांक 11 अ- पुंडलिक गायकवाड ( राष्ट्रवादी काँग्रेस), दशरथ बनकर (भाजप), छाया बोरनारे (शिवसेना), प्रभाग क्रमांक 11 ब- सुवर्णा ठोंबरे ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), विजया डोंगरे (शिवसेना), सविता धुळे (काॅंग्रेस), सीमा पारिक (भाजप), प्रभाग क्रमांक 12 अ- राजेश गायकवाड (भाजप), विजय त्रिभुवन (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), सुनील त्रिभुवन (अपक्ष), शुभम नन्नावरे (उबाठा शिवसेना), सुनील पवार (शिवसेना), सिध्दार्थ बागुल (वंचित बहुजन आघाडी), संदीप वाघ (काॅंग्रेस), विशाल शिंदे (अपक्ष), प्रभाग क्रमांक 12 ब- रेखा आंबेकर (काॅंग्रेस), ज्योती डोंगरे (शिवसेना), जयश्री राजपूत (भाजप), प्रभाग क्रमांक 12 क कविता शिंदे (भाजप), साक्षी सुतवणे (शिवसेना), पुजा क्षीरसागर (काॅंग्रेस)

ती प्रकरणे न्यायप्रविष्ट ...

प्रभाग क्रमांक २ (ब) च्या आक्षेप अर्जाबाबत आज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे....सोमवारी यासंदर्भात सुनावणी होणार आहे. परंतु ज्या कोर्टापुढे सुनावणी होणार आहे. परंतु त्या कोर्टाचे न्यायाधीश सोमवारी रजेवर जाणार असल्याचे समजते. त्यामुळे मंगळवारी ही सुनावणी होणार आहे. प्रभाग क्रमांक 1 अ व ब तसेच प्रभाग क्रमांक 2 ब मधील पाच उमेदवारांची प्रकरणे न्यायाप्रविष्ट असून न्यायालयाच्या निर्णयानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments