news today, वैजापूर तालुक्यात अतिवृष्टी अनुदान वाटपात अन्याय ; पाणी टाकीवर चढून शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन

 वैजापूर, ता.21 - तालुक्यात अतिवृष्टीचे अनुदान वाटपात होत असलेल्या अन्यायामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून या अन्यायाविरुद्ध गेल्या चार दिवसापासून पासून शेतकरी संघटनेकडून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. 

  वैजापूर शहरातील रोटेगाव रोडवरील पाण्याच्या टाकीवर      शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरू केले आहे

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान वाटप करण्यात आले मात्र सदरील नुकसान भरपाईचे पंचनामे महसूल व कृषी प्रशासनाकडून घरबसल्या करण्यात आले एवढेच नव्हे तर सरसकट क्षेत्र हे कोरडवाहू टाकण्यात आले. ज्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला. या प्रकरणात पुन्हा नव्याने पंचनामे करावे व सर्वे करून जी जमीन बागायती आहे तिचे बागायती प्रमाणे अनुदान मिळावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडू उपोषण सुरू असतानाच त्यातील काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी गुरुवारी चार वाजेच्या दरम्यान वैजापूर शहरातील रोटेगाव रोडवरील पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनावर असलेला राग व्यक्त केला व प्रशासनाने तात्काळ आमच्या निवेदनाची दखल घेऊन आम्हाला नुकसान भरपाई मदत मिळून द्यावी अशी मागणी केली. 

दरम्यान, गेल्या तिन दिवसापासून उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने सलग चौथ्या दिवशी आमरण उपोषण सुरूच आहे.

बुधवारी रात्री उशिरा महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांशी फोनवर संपर्क साधून शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल या संदर्भात प्रशासनाला कळवले होते. परंतु त्यावरही तोडगा न निघाल्याने शेतकरी आणि प्रशासन यामध्ये दुरावा  निर्माण होत चालला असून यावर प्रश्नावर काय तोडगा निघतो याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गुरुवारी चार वाजेच्या दरम्यान पाण्याच्या टाक्यावर चढलेले सर्व शेतकरी रात्री तेथेच मुक्काम करणार आहेत जोपर्यंत प्रशासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत माघार नाही अशी शेतकऱ्यांनी आपली भूमिका घेतली आहे



Post a Comment

0 Comments