news today, वैजापुरात नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत 13 जणांचे उमेदवारी अर्ज मागे

25 जागांसाठी 83 उमेदवार निवडणूक रिंगणात ...

.    डॉ.दिनेश परदेशी   संजय बोरणारे     सुभाष गायकवाड 
         (भाजप)             (शिवसेना)            (काँग्रेस)

वैजापूर, ता .21 - वैजापूर नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर शुक्रवारी (ता.21) नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या चार जणांच्या अर्जापैकी दशरथ बनकर या एका उमेदवाराने माघार घेतली तर नगरसेवक पदाच्या 96 वैध उमेदवारांच्या 114 अर्जापैकी तेरा जणांनी आपले अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यात अपक्ष उमेदवारांची आघाडी होती. त्यामुळे या निवडणुकीत बारा प्रभागातील 25 जागांसाठी 83 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी सुभाष गायकवाड (काँग्रेस), दिनेशसिंह परदेशीं (भाजप) व संजय बोरनारे (शिवसेना) यांच्यात तिहेरी मुकाबला रंगणार आहे.
   
नगर परिषद कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत बिघोत व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी सुनील सावंत यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी काजी अब्दुल मलिक सदरोद्दीन (प्रभाग 6 ब), शेख मुद्दसर अन्सार (3 ब), साबेर खान अशरफ (6 ब), धनंजय अभंग (11 अ), वैशाली पवार (5 अ), प्रवीण वाणी (8 ब), प्रदीप चव्हाण (8 ब), शेख कय्युम अमीर (10 ब), अनिता थोरात (३अ), शेख रुकसाना अयुब (४ ब), साबेर खान अशरफ (1 ब) या अकरा अपक्षांसह भारतीय जनता पक्षाचे कुरेशी यांनी प्रभाग क्रमांक 10 ब मधून व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे फेरोज इस्माईल खान यांनी प्रभाग क्रमांक 6 ब मधून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक रिंगणात नगरसेवक पदासाठी 83 उमेदवार राहिले आहेत.

Post a Comment

0 Comments