news today, विसंपदा शाळेत कायदेविषयक शिबीर संपन्न


वैजापूर, ता. 11 - तालुका विधी समिती आणि जिल्हा वकील संघ वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू पी.एस. (विसंपदा) सेमी इंग्लिश शाळा येथे कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न झाले. 

  कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करताना न्या.डी.एस.  पिसाळ...

यावेळी वेजापूर येथील न्यायाधीश डी. एस. पिसाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वकील संघ सोसायटीचे चेअरमन ॲड. सोपान पवार, ॲड. आकाश ठोळे, ॲड. डी. टी. डघळे, ॲड. कुणाल बागुल यांनी विविध कायद्यांविषयी माहिती दिली. यावेळी वकील संघाचे सचिव ॲड. सोहेल पटेल, ॲड. आर. डी. शिरसाठ, ॲड. एन. आर. गायकवाड, विधी समितीचे लिपीक अनिल साळवे, शाळेच्या अध्यक्षा संध्या राजपूत, शिक्षकवृंद जाधव सर, चौधरी सर तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिता कांबळे यांनी केले तर मुख्याध्यापिका ज्योती भोसले यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments