news today, शिऊर येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या

वैजापूर, ता.10 - खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेली नापिकी, वाढते कर्ज आणि सततच्या आर्थिक ताणाला कंटाळून शिऊर येथील एका 52 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सुभाष त्रिंबक सूर्यवंशी असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

शिऊर येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष त्रिंबक सूर्यवंशी यांना पावणे दोन एकर शेती असून त्यांनी शेती व घरखर्चासाठी सोसायटी, राष्ट्रीयीकृत बँक व काही खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सूर्यवंशी यांच्या हाती काहीही आले नाही. घेतलेले कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, या चिंतेत ते सतत राहत होते. याच विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, तीन मुले, भाऊ असा परिवार आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोलिस हवालदार किशोर आघाडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments