news today, नायलॉन मांजा विक्री करणारा पोलिसांच्या ताब्यात

गुन्हे शाखेची वैजापुरात कारवाई ...


वैजापूर, ता.10 - छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता.09) वैजापूर शहरातील दर्गा बेस भागात छापा टाकून शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. फारुख मोहम्मद शेख (वय 45 वर्ष रा.दर्गा बेस) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तीन प्लास्टिक चक्री व एक लाकडी चक्री नायलॉन मांजा असा 2 हजार 600 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. त्याच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
      
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी वैजापूर शहरातील दर्गा बेस भागात छापा टाकून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली.

फारुख मोहम्मद शेख राहणार दर्गा बेस हा वैजापूर येथे बंदी असलेला नायलॉन चायनीज मांजा विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगत असल्याची माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, पोलिस अंमलदार विष्णू गायकवाड, अशोक वाघ, शिवानंद बंनगे, अनिल काळे, महेश बिरुटे, सनी खरात, संजय तांदळे व महिला पोलिस अंमलदार भंडारे यांनी छापा टाकून ही कार्यवाही केली.



Post a Comment

0 Comments