कोपरगांव ता.16- पतंग उडवताना विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने एका 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर तर 19 वर्षीय तरुण जखमी झाला. कोपरगांव शहरातील लक्ष्मीनगर भागात ही घटना घडली.
अर्णव महेश व्यवहारे असे मृत मुलाचे नाव आहे. मूळचा पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी फाटा परिसरातील रहिवासी असलेलां अर्णव हा मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी कोपरगांव येथे मामाच्या घरी आला होता. सणाच्या दिवशी सकाळी अर्णव आपला मित्र ऋषिकेश वाघमारे (19 वर्ष) याच्यासोबत घराच्या गच्चीवर पतंग उडवण्याचा आनंद घेत होता. या आनंदाचे रुपांतर काही क्षणातच शोकांतिकेत झाले. पतंग उडवताना त्यांनी बायडिंग तारेचा वापर केला होता. पतंग आकाशात झेप असताना या तारेचा अचानक जवळून जाणाऱ्या विजेच्या हाय होल्टेज तारेला स्पर्श झाला. तारेचा विद्युत प्रवाह अर्णवच्या शरीरात उतरल्याने झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला तर अर्णव सोबत असलेल्या ऋषिकेशला ही विजेचा धक्का बसला असून तो जखमी झाला. या घटनेची कोपरगांव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments