वैजापूर, ता.20 - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी (मंगळवारी) गट व गणासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांसह अपक्ष अशा 83 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्याकडे दाखल केले. त्यामुळे उमेदवारांची संख्या 91 वर पोहचली आहे. यात पंचायत समिती गणासाठी 45 व जिल्हा परिषद गटासाठी 46 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
वांजरगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पंकज ठोंबरे यांनी अर्ज दाखल केला. त्याप्रसंगी मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, उल्हास पाटील ठोंबरे, सुनील कदम ...
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज, मंगळवारी येथील पंचायत समिती कार्यालयात नाम निर्देशन कक्षात इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारले.
ज़िल्हा परिषद गटासाठी शिवसेनेतर्फे सर्वाधिक 19 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ भाजपाच्या 12 जणांनी, शिवसेना (उबाठा ) चार व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे दोन जणांनी अर्ज दाखल केले.
रामहरी जाधव, पार्वतीबाई रामहरी जाधव, संजय निकम, सुनील पैठणपगारे, वर्षा नंदकिशोर जाधव, संगिता सुभाष तांबे, कल्पना कचरू डिके, डॉ मिसाळ कल्याणी मनाजी, सिनाबाई मनाजी मिसाळ, लहानुबाई सारंगधर डिके, श्रीराम गायकवाड, प्रशांत सदाफळ, सचिन वाणी, संकेत देविदास वाणी, बाबासाहेब जगताप, पंकज ठोंबरे, प्रभाकर बारसे, बाबासाहेब थेटे, प्रकाश शेळके, प्रताप निंबाळकर, अविनाश गलांडे, आदी प्रमुख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. गणासाठीही अर्ज दाखल झाले आहेत.
0 Comments