news today, विहिरीत बुडून एकाचा मृत्यू


वैजापूर, ता .20 - पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.19) सकाळी सव्वा सात वाजेला नागपूर मुंबई महामार्गावर उघडकीस आली. सुरेश रखमाजी इंगळे (वय 55 वर्ष) असे या घटनेतील मृताचे नाव असून त्यांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल जाधव या करीत आहेत.

Post a Comment

0 Comments