news today, वैजापुरात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

वैजापूर ता.13 - जगतगुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेन्द्रचार्यजी महाराज यांच्यावतीने ०4 ते 18 जानेवारी दरम्यान संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिरे होत आहेत. याचे औचित्य साधत या संप्रदायाच्यावतीने श्रीमद रामानदाचार्य नरेंद्रचार्य महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला सोमवारी (ता.12) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ना .रमेश पाटील बोरणारे यांनी पुष्पहार अर्पण व अभिवादन करून रक्तदान शिबिर उदघाटन केले. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील निकम, नगरसेवक बाबासाहेब पुतळे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम राजपूत, गणू पवार, ब्लड बँकेचे डॉ.विशाल जैन, भगवान चौधरी आदी उपस्थित होते.


सोमवारी (ता.12) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात अमृता ब्लड बँक संभाजीनगर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांनीही याप्रसंगी भेट दिली. बोरणारे यांनी रक्तदत्यांना आवाहन करीत या पुण्य कर्माला हातभार लावावे से यावेळी बोलतांना सांगितले.. डॉ.परदेशी यांनीही संप्रदायाच्या या उवक्रमाचे भरभरून कौतुक केले. प्रास्तविक भाषणात धोंडीरामसिंह राजपुत यांनी, नानींजधाम संप्रदायने केलेल्या कामाची माहिती दिली. या संप्रदायाने 1 लक्ष 11 हजार वृक्ष लागवड, साडेचार हजार बंधारे, संप्रदायाच्या राज्यभर 54 अबुलेन्स कार्यरत आहेत. 171 सेवेकरी व भक्तांनी देहदान केलेले आहे तर 110 नागरिकांनी अवयव दान केलेले आहे. तसेच पादुका व दर्शन  सोहळा कार्यक्रमात शिलाई मशीन वाटप, घरघंटी व शालेय संगणक वाटप, स्वावलंबनसाठी गायी, म्हशी, शेळ्या मेंढ्या वाटप व शेतकऱ्यांना शेती औजारे असे विविध लोकोपयोगो वस्तू वाटप करण्यात येत आहेत.

या प्रसंगी संप्रदायाचे संजय काळे, संदीप कुंदे, जयदीप लोखंडे, गौरव बनसोडे, आकाश सोनवणे, शशिकांत भालेराव, ऋषी तसेच महिला संग्राम प्रमुख विमलताई सामृद, मंदाताई जाधव, अलका तुपे, सुवर्णा पाटील, सुभद्रा नाईकवाडी, दुर्गा जाधव यांनी आलेल्या अतिथींचे स्वागत केले. सूत्रसंचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले तर आभार भालेराव व काळे मामा यांनी मानले. 





Post a Comment

0 Comments