वैजापूर, ता.31 - अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार सुभाष झांबड यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. दोन गुन्ह्यांपैकी पहिल्या प्रकरणात हा दिलासा मिळाला असून सरकारी बाजू ऐकून आदेश देण्यात आला. झांबड 7 फेब्रुवारी 2025 पासून कोठडीत होते.
या प्रकरणात आरोपपत्र व पूरक आरोपपत्र दाखल झाले असून सहआरोपींना आधीच जामीन मिळाला आहे. सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद असून दुसऱ्या प्रकरणात 21 कोटींच्या बोगस ठेवी तारण प्रकरणी अपहाराचा आरोप आहे. पुढील अटींचे पालन बंधनकारक राहणार आहे.
0 Comments