वैजापूर, ता.12 - वैजापूर-गंगापूर मतदार संघांचे आमदार रमेश बोरनारे हे शिवसेनेचे मुख्य प्रतोद असल्याने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.. राज्य शासनाने बुधवारी त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिल्याने शहरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत या निर्णयाचे स्वागत केले. या सदस्यांना सरकारी कर्मचारी तसेच शासकीय वाहनांसारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार बोरनारे यांनी विजय मिळविला होता. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी बोरनारे यांच्याकडे मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर वर्षभरातच प्रतोदपदाच्या माध्यमातून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मा.नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, नगरसेवक सुलतान खान, दीपक साळुंके, संजय बोरनारे, वसंत त्रिभुवन, कमलेश आंबेकर, महेश बुनगे, अमोल बोरनारे, श्रीकांत साळुंके, नानासाहेब थोरात, पंजाबराव थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments